सोलापूर : शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ३१ मार्चच्या अगोदर नियोजित असलेल्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार १७ ते ३१ मार्च दरम्यान सोलापूर विद्यापीठत होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातची माहीती विद्यापीठाकडून महाविद्यालयांना कळविण्यात येईल असे, त्या म्हणाल्या.
किंवा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षे संदर्भात माहिती देण्यात येईल. परीक्षा संदर्भांत माहिती लवकरच विद्यापीठाकडून देण्यात येईल, असे कुलगुरू यांनी सांगितले.
दरम्यान ३१ मार्चपर्यंत विद्यापीठात व संलग्नित महाविद्यालयात अध्यापन कार्य बंद ठेवण्यात आले आहे. तसेच ग्रंथालय, वस्तीग्रह बंद ठेवण्यात येणार आहे. प्राध्यापकांनी २५ मार्चपर्यंत घरी राहून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आपत्कालीन कारणास्तव प्राध्यापकांना हजर राहणे बंधनकारक केले आहे.