पुणे – ‘सन्मान एवम् समाधान’ या संकल्पनेअंतर्गत दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांच्या महा मेळाव्याचा प्रारंभ आज पुण्यातील मिल्खा सिंग क्रीडा संकुलात करण्यात आला.
माजी सैनिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात सुमारे 3000 माजी सैनिकांचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग होता आणि अकरा राज्यांमधील 58 ठिकाणचे आणखी 40,000 माजी सैनिक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा, माजी सैनिकांच्या पत्नी आणि माता-पित्यांना आणि ज्येष्ठ वडिलांना निवृत्तीवेतन, ईसीएचएस, सीएसडी कॅन्टीन आणि इतर संबंधित बाबींमध्ये सहाय्य करण्याचा या मेळाव्याचा उद्देश होता.
लेफ्टनंट जनरल ए के सिंह , दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मेळाव्याला संबोधित करण्यासाठी याप्रसंगी इतर अतिथी वक्त्यांमध्ये आयडीएएस च्या अतिरिक्त सीजीडीए देविका रघुवंशी आणि महाराष्ट्र सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड (निवृत्त) यांचा समावेश होता.
दक्षिण कमांड मुख्यालय आणि एडब्ल्यूपीओ च्या समन्वयातून कार्यक्रमादरम्यान निवडलेल्या 10 माजी सैनिकांना रोजगार प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आले. एमपी आणि पीएस डीटीई व्यतिरिक्त, विविध कारणांमुळे निवृत्तीवेतन लाभ न मिळालेल्या गरजू माजी सैनिकांना देखील आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले.