नवी दिल्ली – न्यूज नेशनचे अँकर दीपक चौरसिया त्यांच्या एका लाइव्ह शोमध्ये तोतरे आवाजात अस्ताव्यस्तपणे बोलताना दिसले. जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी रावत यांना जर्नलिस्ट बिपीन रावत म्हटले तर एकदा जनरल व्ही के सिंह म्हंटले. या प्रकारानानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. अनेकांनी ट्वीट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर आता चौरसिया यांना शोमधून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
टीवी न्यूज़ मीडिया के स्वर्ण काल में शराब पीकर एंकरिंग करने के मामले में दीपक चौरसिया ने सबसे पहले बाज़ी मार ली है। अब ये चलन चल पड़ेगा। देखते हैं दीपक को कौन मात देता है! pic.twitter.com/f47kh6FRCU
— Avinash Das (@avinashonly) December 10, 2021
प्रशांत शुक्ला (@journoPrsant) नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले आहे की, हे दीपक चौरसिया आहेत आणि ते शुद्धीवर नाहीत. त्यांना जीभ आणि शब्दांचा ताळमेळ बसत नव्हता, नीट बसताही येत नव्हते. बिपीन रावत यांच्या जागी व्ही के सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. खोट्या राष्ट्रवादाची नशा अंगात शिरली की जीभ अशीच डगमगते आणि खरा चेहरा समोर येतो, अशी टिप्पणी विनोद कापरी यांनी केली आहे. हे कृत्य टेलिव्हिजनवर लाइव्ह अस्वीकार्य आहे, परंतु जेव्हा भारतीय सशस्त्र दलाच्या 13 शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली जात असेल तेव्हा हे कृत्य अक्षम्य गुन्हा आहे. असे म्हंटले आहे. तर माजी आयएएस सूर्य प्रताप सिंह यांनी या व्हिडीओवर “मादक श्रद्धांजली. बदलत्या युगाची पत्रकारिता.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.