कोलकाता – बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या लग्नाचा वादामुळे तर कधी तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे तीची सर्वत्र चर्चा होतांना दिसते.
View this post on Instagram
नुसरत जहाँ अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री आणि खासदार आहे. नुसरत यांनी बंगाली सिनेसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2019 मध्ये त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला आणि तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. नुसरत जहाँ सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असतात.
सोशल तीन नेहमीच बोल्ड फोटो पोस्ट करत असते. या फोटोशूटवर युजर्स दाद देत असतात. मात्र यावेळी पोस्ट केलेल्या फोटोवरून नुसरत यांना चांगले ट्रोल केले जात आहे. बुधवारी (8 डिसेंबर 21) सायंकाळीही नुसरत यांनी असेच फोटो पोस्ट केले होते. मात्र, यावेळी त्यांना बोल्ड फोटोंमुळे नव्हे, तर असे फोटो पोस्ट करण्याच्या टायमिंगमुळे ट्रोल करण्यात आलं.
बुधवारी देशाचे सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे तमिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. याच अपघातात त्यांच्या पत्नीदेखील कालवश झाल्या. तसेच, लष्कराच्या अन्य अधिकारी व जवानांनाही आपले प्राण गमवावे लागले. यामुळे संपूर्ण देश मोठ्या धक्क्यात होता.
View this post on Instagram
पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी रावत यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. मात्र यावेळी खासदार नुसरत जहां यांनी आपले बोल्ड फोटो पोस्ट केल्यामुळे काही लोकांनी नाराजी व्यक्त केली. ‘किमान तुम्ही खासदार असल्याचं तरी भान ठेवा’