नवी दिल्ली : भारताचे पहिले सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. काल सकाळी तामिळनाडूत लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यातून ते प्रवास करत होते. कोईम्बतूर आणि सुलूर यादरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले होतं.
हेलिकॉप्टरमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत देखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत देखील होत्या. त्यांचही या अपघातात निधन झालं.
या दुःखद घटनेनंतर आणखी एक वृत्त समोर आलं आहे. बिपीन रावत आणि 12 जणांचं पार्थिव घेऊन जाणाऱ्या अँम्ब्युलन्सलाही अपघात झाला असून अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याबाबती अधिक माहिती अद्याप हाती आलेली नाही.
चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. रावत, मधुलिका आणि अन्य सर्व मृतांचे मृतदेह मद्रास रेजिमेंट सेंटर येथे आणण्यात आले आहेत. येथून रावत आणि मधुलिका यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात येईल.