शिराळा – पुरोगामी विचारसरणीचा प्रत्येकजण माझ्यासोबत असेल, असा विश्वास माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केला. शिराळा मतदार संघातील 11 गावांतील गोसावी समाजाने आघाडीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. विश्वासचे संचालक विश्वास कदम उपस्थित होते.
ते म्हणाले, समाजाचा सर्व स्तरातून पाठिंबा वाढत आहे. भूलथापांना लोक वैतागले असून रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी या निवडणुकीत जनता परिवर्तन घडवणार आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे.
यावेळी सर्जेराव गोसावी, दिलीप गोसावी, अजय गोसावी, वामन गोसावी, अशोक गोसावी, धोंडीराम गोसावी, प्रमोद गोसावी, गुजर गोसावी, सुखदेव गोसावी, मोहन गोसावी, विठ्ठल गोसावी, राजू गोसावी, विशाल गोसावी, काकासो गोसावी, आनंदा गोसावी, हिंदुराव माळी, विकास मोरे, अजय माळी, माणिक गोसावी, सुभाष गोसावी, रघुनाथ गोसावी, प्रमोद गोसावी, धोंडीराम गोसावी, शिवाजी गोसावी, बबलू गोसावी, काशिनाथ गोसावी व राऊ गोसावी उपस्थित होते.