मॉस्को – रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे नेहमीच चर्चेत असतात सध्या युक्रेन सोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे ते चर्चेत आहेत. या निमित्ताने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती बाहेर येत असून त्यांच्या संपत्तीचे आकडे अनेकांचे डोळे दिपवणारे आहेत. आघाडीचे उद्योगपती एलन मस्क यांच्यापेक्षाही पुतिन यांची संपत्ती जास्त आहे. त्यांच्याकडे तब्बल 43 विमाने आणि सात हजार मोटारी असून त्यांच्या घरातील टॉयलेटही सोन्यापासून बनवण्यात आले आहे.
सन या नियतकालिकाने दिलेल्या माहितीप्रमाणे पुतिन यांच्याकडे तब्बल 9641 अब्ज रुपयांचे सोन्याचे भांडार आहे त्यांच्याकडे अनेक लक्झरी मोटारी असून त्यांचे घर एखाद्या राजमहालासारखे आहे. या महालात अनेक गुप्त खोल्या आणि महाल आहेत काही राजकीय गडबड झाली तर या सर्व संपत्तीचा आणि गुप्त मार्गांचा वापर करून पुतीन आपला बचाव करू शकतात. अशा प्रकारे त्यांनी आपल्या संपत्तीची आणि घराची व्यवस्था केली आहे.
रशियन सरकारसाठी पुतीन यांनी जशी संपत्ती जमवली आहे. तशीच संपत्ती वैयक्तिक पातळीवर जमवली असून ही वैयक्तिक संपत्ती 160 अब्ज पौंड एवढी आहे. असे मानले जाते पुतीन मात्र अधिकृतपणे आपली संपत्ती पफक्त एक करोड रुपये आहे असे सांगतात. पण अनधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पुतीन यांच्या राजमहालातील सोन्याच्या टॉयलेटची किंमत फक्त 50 लाख रुपये आहे. पुतीन जी घड्याळे वापरतात त्यांची किंमतही पाच कोटी रुपयांच्या आसपास आहे.