जामखेड : जामखेड शहरातील विविध भागात कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली असून आज अखेर शहरात तब्बल 14 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या तालुक्यातील एकुण संख्या ही 19 झाली आहे. शहरातील सापडत असलेले ठिकाणे प्रशासनाकडून अद्याप प्रतिबंधक करण्यात आले नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये जा सुरु असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.
काल (दि 29) दुपारी जामखेड शहरातील एका खाजगी डॉक्टर व बँक मॅनेजरसह एकुण 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे शहरात पुन्हा एकच खळबळ उडाली होती. शहरातील रमेश खाडे नगर, बीड रोड, राळेभात गल्ली व गोरोबा टॉकीज जवळ या ठिकाणी सदर रुग्ण आढळून आले आहेत.
4 रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने दखल घेत संपर्कात आलेल्या तब्बल ७३ जणांची कोरोना तपासणी केली होती. या तपासणीत पुन्हा एकच कुटुंबातील 6 तर इतर 2 असे एकुण 8 जण काल रात्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर दिवसभरात शहरात एकुण14 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी दिली.
मात्र सापडलले ठिकाणी अद्याप प्रशासनाने सील केले नाहीत याच ठिकाणावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये जा सुरु आहे त्यामुळे रुग्ण आढळून आलेले क्षेत्र सील करण्याची गरज व्यक्त होत आहे