नांदूर : दौंड तालुक्यातील नांदूर- सहजपूर औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीमुळे परिसरात अनेकांना संक्रमित केले आहे. यात नांदूरचे गावकामगार तलाठी हे औद्योगिक परिसरात पाहणी करीत असताना संबंधित काही बाधित यांच्याशी त्यांचा संपर्क आल्याने त्यांना बाधा झाली आहे. त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
औद्योगिक परिसरात पाहणी करून आल्यानंतर बाधित तलाठी यांना दुसऱ्या दिवशी अचानक त्रास होऊ लागला. त्यांनी खासगी लॅबमध्ये तपासणी केली. त्यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्याबरोबर त्यांची आई व मुलगी पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.
पुणे येथे खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासह आई, मुलगी उपचार घेत आहेत. नामांकित कंपनीमधील इतरही काही हंगामी कर्मचारी, कुटुंबीय पॉझिटिव्ह आढळले आहेत. याकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे, अशी प्रतिक्रिया पश्चिम भागातून उमटत आहे