जुन्नर- जुन्नर शहरातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी शनिवारी (दि. 31) जुन्नर शहर प्रेस क्लबची स्थापना केली. सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करणे, पत्रकारावरील अन्याया विरोधात लढा देणे, विमा संरक्षण देणे, पत्रकार भवन उभारणे, विविध समस्यांच्या विरोधात एकत्रितपणे जनजागृती करणे आदी उद्देशांसह विविध शासकीय अधिकारी व जनता यांच्यामधील दुवा बनणे आदी उद्देश ठेवून या संस्थेची स्थापना करण्यात आल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार दत्ता म्हसकर यांनी सांगितले.
जुन्नर शहर प्रेस क्लब कार्यकारणी पुढीलप्रमाणे- दत्ता म्हस्कर (अध्यक्ष), अतुल परदेशी (कार्याध्यक्ष), नितीन गाजरे (सचिव), अमोल गायकवाड (उपाध्यक्ष), नितीन ससाणे (खजिनदार), हितेंद्र गांधी (प्रसिद्धी प्रमुख). सदस्य – इच्चुभाई सय्यद, धर्मेंद्र कोरे, पवन गाडेकर, दादा रोकडे, प्रा.किशोर चौरे, नितिन कांबळे, विलास कडलक, दर्शन फुलपगार, राजेश डोके, अनिस सय्यद, विनायक गोसावी.