वाघोली- येथील ओमसाई स्टील कंपनीच्या अकाऊंटवर असलेली रक्कम व कंपनीला येणे असलेली रक्कम, अशी 1 लाख 21 हजार रुपये स्वतःच्या अकाऊंटवर ट्रॉन्स्फर करून घेऊन पसार झाला आहे. याप्रकरणी महेंद्र जासूद यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कंपनी कामगार विकास गोपाल मुखर्जी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथे ओमसाई स्टील कंपनी आहे. येथे कंपनीत कामगार विकास मुखर्जी काम करीत होते. मुखर्जी याने कंपनीच्या खात्यातील व कंपनीला येणे असलेली सव्वा लाखांची रक्कम स्वत:च्या अकाऊंटवर टॉन्सफर केली. यानंतर ते पसार झाले आहेत.