पणजी – जगभरामध्ये थैमान घातलेला कोरोना विषाणू भारतात देखील आपले पाय मजबूत करण्याच्या तयारीत असून त्याला वेळीच रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. अशातच परदेशी पर्यटकांची रेलचेल असलेल्या गोव्यात देखील कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारतर्फे गंभीर निर्णय घेण्यात आलेत.
गोवा सरकारच्या निर्णयांबाबत राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून गोव्यातील सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा स्वतः सरकारमार्फत करण्यात येणार असून गोवा डेअरीतर्फे दुधाची वाटप केली जाईल. किराणा मालाच्या पुरवठ्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे राहील.
All shops in the state to remain shut. The government will make arrangements for the distribution of essential commodities. Goa dairy will supply milk&collector will take the decision regarding grocery distribution: Goa Chief Minister Pramod Sawant https://t.co/3Di9bZEN9O pic.twitter.com/lPLZoZHKV2
— ANI (@ANI) March 24, 2020