मुंबई – बॉलिवूड स्टार्स मोठ्या स्क्रिन व्यतिरिक्त सर्वात जास्त पाहायला मिळत असतील तर ती जागा म्हणजे पार्टी. अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या बोल्ड अंदाजात एका पार्टीमध्ये पोहचली होती. चित्रपटांपासून वेब सीरिजपर्यंत सर्वत्र ईशाने आपल्या बोल्डनेसचा जलवा दाखवला आहे. स्क्रीनप्रमाणे ईशा गुप्ता रिअल लाइफमध्येही खूप बोल्ड आहे. नुकतंच, ईशा गुप्ताचा एक लेटेस्ट लूक सोशल मीडियावर समोर आला. जो चांगलाच व्हायरल होत आहे.
पार्टीत सहभागी होण्यासाठी ईशा गुप्ता रात्री उशिरा पोहोचली होती. बंटी सजदेहच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी ईशा एकदम तयार होऊन आली होती. या पार्टीत ईशाच्या लूकची जोरदार चर्चा असताना तिचा हा लूक नेटकऱ्यांना देखील पाहता आला. ब्लॅक बॉडीकॉन बॅकलेस ड्रेसमधील ईशा गुप्ताच्या या सिझलिंग लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
इशा नुकतीच आश्रम ३ या वेब सिरीजमध्ये दिसली होती.बॉबी देओलनंतर आश्रम सिरीजमध्ये सर्वाधिक चर्चेत ठरलेले पात्र ईशाने साकारले होते. या आधी इशा इतक्या बोल्ड अवतारात क्वचितच दिसली असावी. लवकरच ती ‘देसी मॅजिक’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.