पुणे – येरवडा कारागृहातून दोन कैद्यांनी पलायन केले आहे. हे दोन्हीही कैदी करोना पॉझिटिव्ह असून गुरुवारी मध्यरात्री सव्वाएकच्या दरम्यान पळून गेले. तरी आरोपींचा त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन येरवडा पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहितीनुसार, अनिल विठ्ठल वेताळ (वय 21, रा. गणेश नगर, भीमा कोरेगाव, ता-शिरूर) आणि विशाल रामधन खरात (रा.श्री समर्थ हौसिंग सोसा, घर नं 5 निगडी) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींवर भादंवि कलम 307,323,143,147,148,149 नुसार गुन्हे दाखल आहेत.