रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – राजगुरूनगर येथे घरगुती गणपती पर्यावरण पूरक विसर्जन मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे.गेली काही वर्षाच्या नगर परिषदेच्या मूर्तीदान उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
विसर्जन घाटात राजगुरूनगर नगर परिषद, राजगुरूनगर रोटरी क्लब, राजगुरूनगर लायन्स क्लब, ढुम्या डोंगर गिरी भ्रमण ग्रुप, हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशन, पर्याय प्रतिष्ठान, खेड पोलीस स्टेशन, चैतन्य महिला विकास संस्था, महिला दक्षता समिती, राजगुरूनगर बार असोसिएशन आदी संस्था संघटना शहरातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले.
गणपती विसर्जन घाटाचा शुभारंभ नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी मच्छिन्द्र घोलप, रोटरीक्लबचे अध्यक्ष नरेश हेडा, लायन्स क्लबचे अध्यक्ष मिलिंद आहेर, हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील वाळुंज,चैतन्य महिला संस्थेच्या अध्यक्षा डॉ सुधा कोठारी, रेखा क्षोत्रीय, गणेश घुमटकर, अविनाश कोहिणकर, सतीश नाईकरे, माऊली करंडे,अविनाश कहाणे,प्रशांत घुमटकर, नगरसेवक मनोहर सांडभोर, अर्चना घुमटकर, संपदा सांडभोर, नंदा जाधव, सुधीर येवले, कैलास दुधाळे, अमर टाटीया, चेतन घुमटकर, मनीषा टाकळकर यांच्यासह मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.
नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी गणपती विसर्जन पर्यावरण पूरक करण्याचे सर्वाना आवाहन केले होते त्यांच्या आवाहनाला नागरिकांना मोठा प्रतिसाद लाभला. केदारेश्वर मंदिराज भीमानदी स्वच्छ ठेवण्याचा व प्रदूषण दूर करण्याचा नगर परिषदेच्या प्रयत्न आहे. गणपती विसर्जन सुरक्षित सहज व्हावे यासाठी सुसज्ज नियोजन ठेवण्यात आले आहे. विसर्जन घाटात नगरपरिषदेने आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. नगरपरिषदेने आवाहन केल्यानुसार घरगुती गणेश मूर्ती जवळपास १०० टक्के दान करण्यात आल्या. दान केलेल्या गणेश मूर्ती अनिल कुटे यांनी सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या. निर्माल्य गोळा करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आल्यानेनगर परिषदेच्या या उपक्रमाचे सर्वानी स्वागत केले.