अहमदनगर : शहरातील सर्वच सार्वजनिक आणि घरगुती गणपतींना निरोप देण्यात येत आहे. दरम्यान, शहरातील कापड बाजारातील शहाजी चौकात रंग संस्कृती फाउंडेशनने लक्षवेधी रांगोळी काढली आहे. ही रांगोळी नगरमधील सगळ्यात मोठी रांगोळी ठरली आहे. तर दुसरीकडे रांगोळीच्या माध्यमातून बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश देण्यात आला आहे.