मुंबई – स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. लवकरच या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. आशुतोष केळकरची बहिण वीणा हे पात्र आता या मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विणाच्या एंट्रीने मालिकेला नवं वळण मिळणार आहे.
विशेष म्हणजे आशुतोषची बहिण वीणा अनिरुद्धची बिझनेस पार्टनर म्हणून देखील दिसणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडे हिने वीणा हे पात्र साकारले आहे. मात्र वीणा ही आता अनिरुद्धची बिझनेस पार्टनर असल्याने याचा त्रास आशुतोष आणि अरुधंतीला होणार का हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, खुशबूने याआधी ही अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. खुशबूने ‘आम्ही दोघी’या मालिकेत मीराची भूमिका साकारली होती. ‘तेरे बिन, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’या हिंदी मालिकेत मालिकेतही तिने काम केले आहे. तर सध्या ‘मेरे साई’या मालिकेत सुद्धा प्रमुख भूमिकेत ती दिसत आहे. आता ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तिची नेमकी कशी भूमिका असणार हे पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत.