मुंबई – अभिनेत्री आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये 10 वर्षे पूर्ण केली आहेत. या 10 वर्षांत आलियाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तिचे काही चित्रपट लोकप्रिय झाले तर काही फ्लॉप ठरले. आलियाने 2012 साली ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात केली. अभिनयासोबतच तिचे नाव घराणेशाहीसाठी खूप घेतले गेले. यामुळे आलियाला अनेकदा ट्रोलचा सामनाही करावा लागला आहे. अशात आता तिने या विषयावर उघडपणे आपलं मत मांडला आहे.
आलिया भट्ट घराणेशाहीवर भाष्य केले आहे. चित्रपटात सहज काम मिळाल्याचे तिने कबूल केले. पण, त्याचवेळी आलियाने कामात 100 टक्के दिले आहेत. आलिया म्हणते की,’इतर लोकांपेक्षा इंडस्ट्रीत काम मिळवणे तिला सोपे होते. ती तिच्या स्वप्नांची तुलना इतर लोकांच्या स्वप्नांशी करते. कोणतंही स्वप्न लहान किंवा मोठं नसतं यावर आलियाचा विश्वास आहे. सर्व स्वप्ने समान असतात.’ तिने असेही म्हटले की ‘या सर्व गोष्टी कुठून येतात हे तिला चांगले समजते.’ आलिया भट्ट याआधीही एकदा घराणेशाहीबद्दल महणाली होती की,’वडिलांमुळे काम मिळाले नाही, तर करण जोहरमुळे इंडस्ट्रीत काम मिळाले’
आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर,’ती लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘गली बॉय’ नंतर पुन्हा एकदा त्यांची जोडी रणवीर सिंगसोबत पडद्यावर दिसणार आहे.