बावडा – येथील एका 65 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंदनशिवे यांनी दिली. करोनामुक्त बावडा गावात शिरकाव झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामस्थही खडबडून जागे झाले आहेत.
रविवार (दि.19) येथील 65 वर्षीय महिलेस संसर्ग झाल्यानंनर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून सोमवार (दि.20) पासून सात दिवसांसाठी गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे.
पूर्ण आठवडाभर गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे सरपंच किरण पाटील, ग्रामसेवक बी. ए. नागपुरे व बावडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.