कार्ला – वेहरगाव येथील उद्योजक बबनराव काशिराम माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी आमदार कृष्णराव भेगडे, संत तुकाराम सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष बबनराव भेगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्याअध्यक्ष दीपक हुलावळे, पुणे जिल्हा परिषद सभापती बाबुराव वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.
बबनराव माने यांच्या प्रवेशाने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला याचा फायदा होणार आहे. या वेळी आकाश माने, भाऊसाहेब माने, गणेश माने, अशिष माने, अक्षय माने, पप्पू माने यांनी प्रवेश केला.