नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीनच्या नव्या नकाशावर प्रतिक्रिया देत मोदी सरकारला सवाल केला आहे. ‘मी वर्षानुवर्षे म्हणत आलो आहे की लडाखमध्ये एक इंचही जमीन गेली नाही, असे पंतप्रधान जे म्हणतात ते खोटे आहे. संपूर्ण लडाखला माहित आहे. चीनने आमची जमीन घेतली आहे.’ राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलतांना मोदी सरकारवर प्रश्न उपस्थिती केले.
#WATCH | Delhi | While leaving for Karnataka, Congress MP Rahul Gandhi speaks on China government’s ‘2023 Edition of the standard map of China’; says, “I have been saying for years that what the PM said, that not one inch of land was lost in Ladakh, is a lie. The entire Ladakh… pic.twitter.com/NvBg0uhNY1
— ANI (@ANI) August 30, 2023
दरम्यान, वृत्तसंस्थेशी बोलताना राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘नकाशाबाबतची बाब अतिशय गंभीर आहे, पण त्यांनी (चीन) जमीन आधीच घेतली आहे. त्याबाबतही पंतप्रधानांनी काही बोलले पाहिजे.’ असं म्हणत मोदी सरकारने या गंभीर प्रश्नांनावर आपली भूमिका स्पष्ट करायला हवे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनने 28 ऑगस्ट रोजी त्याच्या मानक नकाशाची 2023 आवृत्ती जारी केली. यामध्ये अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन या भारतातील राज्यांना त्यांचा प्रदेश म्हणून वर्णन करण्यात आले आहे. यासोबतच तैवान आणि दक्षिण चीन समुद्रावरील दाव्यांसह इतर क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय भूभागावरील चीनच्या दाव्याला भारताने तीव्र विरोध दर्शवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, “भारताच्या भूभागावर दावा करणाऱ्या चीनच्या तथाकथित मानक नकाशावर आम्ही राजनयिक माध्यमांद्वारे निषेध नोंदवला आहे. आम्ही हे दावे फेटाळतो कारण त्यांना कोणताही आधार नाही. अशा पावलांमुळे चिनी बाजूने सीमाप्रश्नाचे निराकरण आणखी गुंतागुंतीचे होईल.’ असेही ते म्हणाले आहे.
या प्रकरणावर भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी वृत्तवहिनीला सांगितले की, चीनला आपल्या मालकीच्या नसलेल्या प्रदेशांवर दावा करण्याची जुनी सवय आहे. भारताच्या काही भागांसह नकाशा जारी केल्याने काहीही बदलणार नाही. आमचे सरकार याबाबत स्पष्ट आहे. निरर्थक दावे करून दुसऱ्याचे क्षेत्र आपले होत नाही.