#SLvENG : इंग्लंडचा श्रीलंकेवर विजय

गॅले  – इंग्लंडने यजमान श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यातही पराभव करत दोन कसोटी सामन्यांची ही मालिका 2-0 अशी जिंकली. या डावात खास गोष्ट ठरली “ती म्हणजे इंग्लंडच्या जेम्स ऍण्डरसन, सॅम कुरेन व मार्क वुड या गोलंदाजांनी पहिल्या डावात श्रीलंकेचे 10 गडी बाद केले. मात्र, त्यांच्यापैकी एकाही गोलंदाजाला श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात एकही गडी बाद करता आला नाही.’ 

या सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव 381 धावांवर संपला होता. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 344 धावा केल्या होत्या. पहिल्या डावातील 37 धावांच्या आघाडीनंतर दुसरा डाव सुरू केल्यावर श्रीलंकेचा संघ अवघ्या 126 धावांत गारद झाला व इंग्लंडसमोर विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य होते.

इंग्लंडने आपल्या या डावात 4 गडी गमावून विजय मिळवला. इंग्लंडकडून डॉमनिक सिबलीने नाबाद अर्धशतकी खेळी केली. या मालिकेनंतर आता इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.