ICICI बँकेच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या ‘असा’ मिळेल FASTag

नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय (ICICI Bank) बँकेने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना महत्वाची सुविधा देत गुगल पे (Googole Pay) बरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. या सुविधेनुसार आता ग्राहकांना त्यांचा FASTag गूगल पेद्वारे मिळू शकेल.

बँकेचे ग्राहक गुगल पे च्या UPI च्या माध्यमातून FASTag खरेदी करू शकतात. यामुळे वापरकर्त्यांना पेमेंट अॅपवरच यूपीआय मार्फत डिजिटल रूपात आयसीआयसीआय बँक फास्टॅग ऑर्डर करणे, ट्रॅक करणे आणि रिचार्ज करण्याची सुविधा मिळेल.

बँकेच्या या उपक्रमामुळे ग्राहकांची सुरक्षा सुनिश्चित होईल. FASTag खरेदीसाठी त्यांना टोल प्लाझा किंवा इतर कोणाकडे जाण्याची आवश्यकता नाही. या घोषणेसह आयएसआयसीआय बँक FASTag जारी करण्यासाठी Google पे सह भागीदारी करणारी पहिली बँक बनली आहे. हा उपक्रम FASTag साठी डिजिटल पेमेंटला अधिक मजबूत करेल.

काही दिवसांपूर्वीच आयसीआयसीआय बँकेने मुंबई टोल प्लाझा आणि हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंग झोनमध्ये प्रवाश्यांसाठी FASTag एकत्रीत केले आहे. FASTag इलेक्ट्रॉनिक टोलिंग हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्पातील एक भाग आहे.

या पद्धतीने घ्या Google Pay वरून FASTag

  • यासाठी तुम्हाला आधी तुमच्या मोबाईलमध्ये Google Pay उघडावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला ICICI Bank FASTagवर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला Buy New FASTag लिहिलेले दिसेल.
  • ते उघडल्यानंतर तुम्हाला पॅन क्रमांक, आरसी कॉपी, वाहनाचा क्रमांक आणि पत्त्याचा तपशील भरावा लागेल.
  • ओटीपीच्या सहाय्याने तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पडताळावा लागले.
  • पेमेंट झाल्यानंतर ऑर्डर येते.

ICICI बँक व्यतिरिक्त इतर ग्राहकही याचा लाभ घेऊ शकतात –

जे वापरकर्ते आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक नाहीत ते पॉकेट अॅपचा वापर करून किंवा www.icicibank.fastag वर भेट देऊन फास्टॅग खरेदी करू शकतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.