इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेचे वेळापत्रक जाहीर

रुटऐवजी स्टोककडे नेतृत्वाची शक्‍यता

लंडन – करोनाचा धोका कमी झाल्याने जागतिक क्रिकेटला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. येत्या 8 जुलैपासून वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडविरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येथे येणार असल्याचे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने जाहीर केले आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रुट कौटुंबिक कारणामुळे उपलब्ध नसल्याने पहिल्या कसोटीसाठी संघाचे नेतृत्व अष्टपैलू बेन स्टोक्‍स याच्याकडे सोपविण्यात येणार आहे.

तसेच या मालिकेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. करोनाचा धोका सुरू झाल्यानंतर जागतिक क्रिकेट ठप्प झाले होते. तीन महिने कोणताही देश सामने खेळू शकलेला नाही. मात्र, आता इंग्लंडमध्ये झालेला करोनाचा हाहाकार संपुष्टात आल्याने क्रिकेट पुन्हा एकदा अवतरणार आहे.

करोनामुळे क्रिकेट खेळत असलेल्या विविध देशांचे नुकसान झाले असून लवकरात लवकर स्पर्धा सुरू होणे महत्त्वाचे असल्याने आयसीसीनेही प्रयत्न सुरू केले होते. अर्थात, या दोन संघातील मालिका खेळवली जाणार असली तरीही यातील सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश देणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. या मालिकेला येत्या 8 जुलैपासून हॅम्पशायर कौंटीच्या गेस बाऊल मैदानावर पहिल्या कसोटी सामन्याने सुरुवात होणार आहे.

कसोटी मालिका…

8 ते 12 जुलै पहिली कसोटी ( गेस बाउल)
16 ते 20 जुलै दुसरी कसोटी (ओल्ड ट्रॅफर्ड)
24 ते 28 जुलै तिसरी कसोटी (ओल्ड ट्रॅफर्ड)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.