अहमदाबाद – एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवारी (५ ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना होतआहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने अनुभवी फलंदाज जो रूटच्या 77 धावांच्या जोरावर 50 षटकांत नऊ गडी गमावून 282 धावा केल्या असून न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी 283 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने सर्वाधिक 77 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 50 धावांचा टप्पा गाठता आला नाही.
We’ve completed our innings and have set New Zealand 2️⃣8️⃣3️⃣ to win.
📍 Narendra Modi Stadium#EnglandCricket | #CWC23 pic.twitter.com/9DX5jjQpDD
— England Cricket (@englandcricket) October 5, 2023
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडने 50 षटकांत नऊ गडी गमावून 282 धावा केल्या. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 50 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. जो रूटने 86 चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि एक षटकारही लगावला. 42 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सने त्याला क्लीन बोल्ड केले.
कर्णधार जोस बटलरने 43 धावांचे तर जॉनी बेअरस्टोने 33, हॅरी ब्रूकने 25 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 20 धावांचे योगदान दिले. आदिल रशीदने नाबाद 15, डेव्हिड मलान आणि सॅम कुरनने प्रत्येकी 14, मार्क वुडने नाबाद 13, मोईन अली आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी 11 धावा केल्या.
या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या स्फोटक फलंदाजांना मुक्तपणे खेळू दिले नाही. वेगवान आणि फिरकीच्या मिश्रणाने इंग्लिश संघाला परेशान केले. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने सर्वाधिक तीन बळी घेतले. फिरकीपटू मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांना प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.