ICC World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाज अॅडम झाम्पाने विश्वचषक स्पर्धेत फिरकी गोलंदाजाकडून सर्वाधिक विकेट घेण्याच्या मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली. जसप्रीत बुमराहची विकेट घेत झाम्पाने श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली.
दोघांनी 23 विकेट घेतल्या –
यापूर्वी, फिरकी गोलंदाज म्हणून मुथय्या मुरलीधरनने 2007 च्या विश्वचषकात सर्वाधिक 23 बळी घेतले होते. आता अॅडम झाम्पाच्या 2023 वर्ल्ड कपमध्ये 23 विकेट्स आहेत. तर ब्रॅड हॉगने 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये 21 विकेट घेतल्या होत्या. या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदी चौथ्या क्रमांकावर आहे. 2011 च्या विश्वचषकात त्याने 21 विकेट घेतल्या होत्या. दिवंगत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने 1999 च्या विश्वचषकात 20 विकेट घेतल्या होत्या. स्पिनर म्हणून वॉर्न विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे.
मुरलीधरनचा विक्रम मोडण्याची होती संधी –
मात्र, या विश्वचषकात अॅडम झाम्पाला मुथय्या मुरलीधरनचा विक्रम मोडण्याची उत्तम संधी होती. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात अॅडम झाम्पाने 10 षटकांत 44 धावा देत एक विकेट घेतली. अशा प्रकारे मुरलीधरन आणि अॅडम झाम्पा हे दोघेही 23-23 विकेट्ससह बरोबरीवर आहेत.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर पॅट कमिन्सind-vs-aus-icc-world-cup-2023-final-adam-zampa-equal-muttiah-muralitharan-record आणि हेजलवूडने 2-2 विकेट घेतल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 धावांची खेळी खेळली. तर विराट कोहलीने 54 धावांची तर रोहित शर्माने 47 धावांची खेळी केली.