ICC World Cup 2023 IND vs AUS Final Toss Update : भारतीय संघाने विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताचा सामना 5 वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाशी आज (19 नोव्हेंबर) दुपारी 2 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. एकीकडे भारताने सलग 10 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला 2 सामने गमावले,परंतु यानंतर संघाने सलग 8 सामने जिंकून अंतिम फेरी गाठली.
तत्पूर्वी,झालेला नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलिया संघाच्या बाजूनं लागला आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक(TOSS)जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, त्याने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. रोहितने सांगितले की, मी Toss जिंकला असता तर प्रथम फलंदाजीचाा निर्णय घेतला असता. दुसरीकङे ऑस्ट्रेलियन संघातही कोणताही बदल झालेला नाही.
दरम्यान, भारतीय संघाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने तीन वेळा एकदिवसीय विश्वचषक फायनल खेळली. यामध्ये भारताला 2 वेळा विजय आणि एकदा पराभव स्विकारावा लागला.1983 मध्ये, भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता, जिथे त्याने वेस्ट इंडिजचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले होते.
यानंतर 2003 मध्ये भारत दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. त्यानंतर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारताला ऑस्ट्रेलियाकडून 125 धावांनी पराभव पत्करावा लागला.त्यानंतर 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेला हरवून भारताने 28 वर्षांचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर आज भारत विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.