पुणे – वारजे येथील अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला भाजी विक्रेत्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी पाच जणांवर सरकारी कामात अडथळा कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात एकाला जामीन मंजुर झाला आहे.
रोहन मल्हारी माळशिखरे (वय 19, रा.वारजे) याला सत्र न्यायाधीश जे.गी. डोरले यांनी जामीन मंजुर केला आहे. त्याने ऍड. अभिषेक हरगणे, ऍड. ओंकार फडतरे, ऍड. दीपक जाधव यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.