नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज राउझ अव्हेन्यू न्यायालयातील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी जामीन मंजूर केला आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीचे समन्स धुडकावल्याने त्यांच्या विरोधात ईडीने केार्टात धाव घेतली होती.
दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांनी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आणि नमूद केले की भारतीय दंड संहितेचे कलम १७४ जामीनपात्र आहे आणि दोन्ही तक्रार प्रकरणांमध्ये त्यांनी केजरीवालांना प्रत्येकी १५००० हजार रुपये जमानत भरण्याचे निर्देश दिले आहेत.
केजरीवाल यांनी ईडीने जारी केलेल्या प्रत्येक नोटीसला उत्तर दिले परंतु ते ईडीपुढे वैयक्तिकरित्या हजर राहिले नाहीत. त्याची कारणेही केजरीवालांनी ईडीला दिली आहेत.
परंतू असे असूनही, अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवालांना सायक्लोस्टाईल नोटीस जारी करणे सुरू ठेवले. सेशन्स कोर्टात समन्सला आव्हान देताना केजरीवाल यांनी पुढे सांगितले की त्यांच्याकडून हेतुपुरस्सर अवज्ञा केली गेली नाही.
कथित दिल्ली मद्य धोरण मनी लाँडरिंग प्रकरणात समन्सचे पालन न केल्याबद्दल ईडीने नुकतीच दुसरी तक्रार घेऊन न्यायालयात धाव घेतली होती.