पुणे – अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला एक वर्ष सक्तमजुरी आणि 12 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के.के. जहागिरदार यांनी सुनावली. दंडाची रक्कम अपील कालवधी संपल्यानंतर पीडितेला देण्यात यावी, असे न्यायालयने आदेशात म्हटले आहे.
रतन दगडूबा वाडकर (वय 19) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 17 वर्षीय पीडितेने हडपसर पोलिसात फिर्याद दिली होती. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुचित्रा नरोटे यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. 10 फेब्रुवारी 2021 रोजी ही घटना घडली.
फिर्यादीला तोंडाला दाबुन फ्लॅटमध्ये ओढून अश्लील चाळे करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. न्यायालयाने विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार कायदा कलम 12 नुसार शिक्षा सुनावली आहे.