जम्मू-काश्मीर – जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी शस्त्रे जप्त केली आहेत. दोन्ही दहशतवादी जैश या संघटनेशी संबंधित असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. चौगाम येथे शनिवारी सकाळी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन दहशतवादी ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
Encounter breaks out between security forces and terrorists in Chowgam area of Shopian, Jammu and Kashmir: Police
— ANI (@ANI) December 24, 2021
ब्रेपोरा येथील सज्जाद अहमद चेक आणि पुलवामा येथील राजा बासित नजीर अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. अधिकाऱ्यांकडून अद्याप दहशतवाद्यांच्या नावांना दुजोरा मिळालेला नाही.
#UPDATE | Two unidentified terrorists neutralized in the encounter that broke out between security forces and terrorists in the Chowgam area of Shopian. Incriminating materials including arms & ammunition recovered. The search operation is underway: Kashmir Zone Police pic.twitter.com/fphCiEXP3f
— ANI (@ANI) December 25, 2021
तत्पूर्वी, पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने पहाटे परिसराची घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. पोलिसांचे संयुक्त पथक संशयास्पद स्थळाकडे निघताच लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी दोघांनाही ठार केले.