मुंबई – चित्रपटाद्वारे समाजातील सामाजिक विषयांचे चित्र प्रेक्षकांसमोर मांडणारे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक ‘प्रवीण तरडे’ पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊन आले आहेत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे ‘हंबीरराव मोहिते’ यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रात
पसरली आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास प्रविण तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आणणार आहेत.
18 डिसेंबरला या चित्रपटाचा दमदार असा टिझर प्रदर्शित झाला असून, हा टिझर पाहिल्यावर तुमच्या ही अंगावर शहारे आल्या शिवाय राहणार नाही. ‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’, असं म्हणत या ऐतिहासिक चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.
चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत स्वतःहा प्रवीण तरडे असणार आहेत. तर, दुसरीकडे मराठमोळा अभिनेता ‘गश्मीर महाजनी’ हा छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारणार आहे.
दरम्यान, या दमदार टीझरला चक्क ‘बाहुबली’कडून कौतुकाची थाप मिळाली आहे. ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास याने प्रवीण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या टीझरचे
कौतुक केले आहे. प्रभासने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित चित्रपटाचे कौतुक केले आहे. तर प्रवीण तरडेंनी सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया देत अभिनेता प्रभासचे आभार मानले आहेत.
नक्की काय म्हणाले प्रवीण तरडे….
‘केलेल्या कामाचं चीज झालं…! आज सरसेनापती हंबीररावच्या टिझरचं कौतुक बाहुबली प्रभासने केलं.. परवा जवळचे मित्र सुबोध भावे, संजय जाधव, विजु माने, अमित भंडारी, अमेय खोपकर यांनीही केल होतं.. मित्रांनो तुमचेही खुप आभार असेच पाठीशी राहा.. आज प्रभासने दिलेल्या शुभेच्छा पुढच्या प्रवासात महत्वाच्या ठरतील..’