पुणे – गेली 35 वर्षे “प्रभात’च्या सेवेत एकरूप झालेले दीपक पायगुडे, भरत कटके आणि प्रकाश जाधव हे तीन कर्मचारी आज (दि. 31) सेवानिवृत्त झाले. मशीन खात्यात सुरुवातीपासून कार्यरत असलेल्या या तिघांनी या खात्याचे काम वैशिष्ट्यपूर्णरित्या करीत “प्रभात’चा अंक दर्जेदार ठेवण्यासाठी दक्ष राहिले. शिक्षण कमी असूनही ब्लॅक-व्हाईटच्या युगातही त्यांनी आपला ठसा उमटवला. पानांची संख्या वाढल्यावर आणि “प्रभात’ची वाटचाल रंगीत पानांकडे झाल्यावरही त्यांनी हे नवीन तंत्रज्ञान लीलया आत्मसात केले. इतकेच नाही तर आता सेवानिवृत्त होत असताना त्यांनी या कामासाठी तरुणांची एक नवी फळी तयार केली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस “प्रभात’ परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.