मुंबई – निर्यातीत भारत मोठी झेप घेण्याच्या दिशेने काम करत आहे. 2021-22 वर्षासाठी 400 अब्ज अमेरिकी डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे, असे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांनी केले.
त्यानी निर्यात प्रोत्साहन परिषदांना आवाहन केले की, 2021-22 वर्षासाठी 400 अब्ज अमेरिकी डॉलर्स निर्यातीचे महत्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्यासाठी तातडीने कृती करावी. आपल्याला पुढील 8 महिन्यात 34 अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढी निर्यात कायम ठेवायची आहे. ध्येय महत्वाकांक्षी आहे, मात्र सर्व निर्यातदार परिषदांनी एकत्रित प्रयत्न केल्यास शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.
2030 पर्यंत 2 लाख कोटी अमेरिकी डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य निर्धारीत करावे, यात वाणिज्यिक निर्यात 1 लाख कोटी अमेरिकी डॉलर्स आणि सेवा क्षेत्र निर्यात 1 लाख कोटी अमेरिकी डॉलर्स अशी असावी.
मुक्त व्यापार करार धोरणात सुधारणा करण्यात येत आहे. आपली बाजारपेठ आणि परदेशातील बाजारपेठ यांचा समन्वय साधत नवीन मुक्त व्यापार करारावर भर देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या क्षेत्रात आपली स्पर्धाक्षमता आहे हे सामुहिक प्रयत्नांतून लक्षात घेणे आवश्यक आहे.
भारत इंग्लंड, युरोपीय संघटना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युएई, इस्रायल आणि इतर आखाती व्यापार परिषद सदस्य देशांसोबत मुक्त व्यापार करारासंदर्भात अतिशय सकारात्मक वातावरण आहे. ज्या देशांमध्ये आपल्याला पुरेसा वाव आहे आणि ज्याठिकाणच्या बाजारपेठेत आपण उत्तम स्पर्धा करु याकडे लक्ष पुरवण्यात येत आहे.