भोपाळ- कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विमानाचे भोपाळ विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे विमान भोपाळमध्ये उतरवण्यात आले. सोनिया आणि राहुल गांधी विरोधी ऐक्याची बैठक संपवून बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बसले होते.
राहुल आणि सोनिया भोपाळ विमानतळावर पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर भोपाळचे कॉंग्रेस नेते विमानतळाकडे रवाना झाले. इमर्जन्सी लॅंडिंगनंतर राहुल-सोनिया यांना भोपाळ विमानतळाच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये काहीरकाळ थांबावे लागले. कॉंग्रेस नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनिया आणि राहुल गांधी यांनी नंतर रात्री 9.30 वाजता इंडिगोच्या विमानाने दिल्ली गाठली.