तळेगाव ढमढेरे – स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले मुली शिकल्या पाहिजे यासाठी स्वतः धर्मपत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन पहिली महिला स्त्री शिक्षिका केले. पुण्यात भिडे वाड्यात पहिली शाळा सुरू केली. अशा थोर महात्म्याचे कार्य आत्मसात करणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी तळेगाव ढमढेरे येथे अभिवादन कार्यक्रमात व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात असलेल्या महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुण्यतिथी निमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन महात्मा फुले सांस्कृतिक प्रतिष्ठाण, ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे व कृषी उत्पन्न उपबाजार समिती यांच्या वतीने करण्यात आले होते.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या 133 व्या पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात फुलांच्या माळेने साजविण्यात आले होते. सकाळच्या सत्रात कार्यक्रम होत असल्याने ग्रामस्थांची मोठी गर्दी होती.
यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, माजी उपसभापती अनिल भुजबळ, शिरूर तालुका अध्यक्ष विश्वास ढमढेरे, महिलाध्यक्षा विद्या भुजबळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदीप गुंदेचा, सरपंच अंकिता भुजबळ, माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ, कासारीचे माजी सरपंच संभाजी भुजबळ, उपसरपंच राहुल भुजबळ, माजी उपसरपंच गणेश तोडकर, मंच्छिन्द्र भुजबळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेश भुजबळ, उपाध्यक्ष किशोर रासकर, ओबीसी सेवा संघांचे अध्यक्ष बाळासाहेब लांडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष ढमढेरे, मनोज आल्हाट, स्वाती लांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सहाय्यक सचिव अनिल ढमढेरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक शेलार, वसंत भुजबळ, संदीप ढमढेरे, उमेश भुजबळ, संपत ढमढेरे, नवनाथ भुजबळ, बापूसाहेब कापरे, दादाभाऊ शिनलकर, किरण शिंदे, मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण, सुवर्णा चव्हाण, सुनीता पिंगळे, जयवंत भुजबळ उपस्थित होते.