नवी दिल्ली – सहा राज्यांमधील राज्यसभेच्या 12 जागांसाठी येत्या 31 मार्चला निवडणूक होणार आहे. राज्यसभेतील 12 नेते येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. या रिक्त होत असलेल्या 12 जागांसाठी 31 मार्च रोजी निवडणूक घेण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने आज सांगितले.
आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, नागानॅन्ड आणि त्रिपुरातील राज्यसभेचे सदस्य 2 एप्रिलला निवृत्त होत आहेत. तर पंजाबमधील 5 सदस्य 9 एप्रिलला निवृत्त होत आहेत. या निवडणूकीची अधिसूचना 14 मार्च रोजी जारी केली जाणार आहे आणि 31 मार्च रोजी मतदान होणार आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या प्रमुख सदस्यांमध्ये ए.के. ऍन्टनी (केरळ), आनंद शर्मा (हिमाचल प्रदेश) आणि प्रताप सिंह बाजवा, नरेश गुजराल (पंजाब) यांचा समावेश आहे.
राज्यसभेवर पंजाबमधून कोणाला पाठवायचे याचा निर्णय विधानसभेच्या निवडणूकांच्या निकालावर अवलंबून असणार आहे.