वाघोली (प्रतिनिधी) – महाराष्ट्र प्रदेश क्रिडा आघाडी संयोजक तथा अध्यक्ष पदी संदीप भोंडवे यांची निवड झाली असून त्यांना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ , विक्रांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. “पक्षाने विश्वास दाखवुन माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे .ती जबाबदारी मी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडील’ असे संदीप भोंडवे यांनी सांगितले आहे.
संदीप भोंडवे यांच्याकडे हवेली तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. तालुक्यात भाजपची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भोंडवे यांनी मोलाची कामगिरी केली आहे. याचबरोबर नुकताच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत देखील उत्तम आयोजन कामी भोंडवे यांनी योगदान दिले होते.
भोंडवे यांच्या जाणता राजा कुस्ती केंद्राच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरजू कुस्ती मल्लांना मार्गदर्शन तसेच अनमोल अशी मदत व मार्गदर्शन लाभत आहे. भोंडवे यांच्या निवडीबद्दल भाजप नेते प्रदीप कंद, गणेश कुटे, पुणे जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण दगडे, सुदर्शन चौधरी, संदीप सातव, विजय हरगुडे, प्रिया पवार, अजित कुलथे,
सचिन जायभाये, शाम गावडे,अमोल शिवले, सूरज चव्हाण, मुन्नाभाऊ राखपसरे,उमेश मोरे, स्वप्नील कंद, गौरव झुरूंगे, ओंकार कंद, गणेश सातव, विजय जाचक, प्रदिप सातव, अविनाश सातव,विलास सातव, दिनेश झांबरे, सचिन हरगुडे, आदींनी अभिनंदन केले आहे.