पुणे (प्रतिनिधी) – अल्पवयीन (14 वर्षाच्या) मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 61 वर्षीय ज्येष्ठाला विशेष न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी तीस हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. माधव रामचंद्र वाघ असे त्याचे नाव असून, त्याचे विरुद्ध कोथरूड पोलीस स्टेशन येथे अत्याचार व बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
त्याने अॅड. हेमंत झंझाड यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. वाघ हे कोथरूड येथील शाळेमध्ये व्यवस्थापक या पदावर कार्यरत असताना त्यांनी गुन्हा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाघ ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्या विरुद्ध खोटी फिर्याद देण्यात आलेली आहे. तसेच, गुन्ह्यातील सर्व प्रमुख साक्षीदारांनी वाघ याचा गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही. त्याला या गुन्ह्यात गोवण्यात आलेले आहे, असे पत्र गुन्हा दाखल झाल्यावर तीन दिवसांनी पुण्याचे पोलीस आयुक्तांकडे दिले होते . दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर तसे पत्र त्यांनी न्यायालयामध्ये सुद्धा दिले. ही बाब अॅड.हेमंत झंजाड यांनी निदर्शनास आणून दिली.