तान्हाजी: द अनसंग वॉरियर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. चित्रपट प्रदर्शित होऊन २६ दिवस उलटलेले असतानाही चित्रपटाची घौडदौड अद्याप कायम आहे. आतापर्यंत जवळपास २४६ कोटींचा बिझनेस चित्रपटाने केला आहे. या चित्रपटातून अभिनेत्री इलाक्षी गुप्ता हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने या चित्रपटात सोयराबाईची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून ती घराघरात पोहचली.
इलाक्षी एक डेंटल सर्जन असून फिटनेस फ्रीक सुद्धा आहे. ती दररोज जिममध्ये इंटेन्स वर्कआऊट आणि पिलाटेस सेशन करते. इलाक्षीला नेहमीच एक अशी भूमिका करायची होती जे तिच्या व्यक्तिमत्वला शोभून दिसेल आणि सोयराबाईच्या भूमिकेपेक्षा इतर कोणती भूमिका नाही. इलाक्षी एक डेंटल सर्जन असून फिटनेस फ्रीक सुद्धा आहे ती रोज जिम मध्ये इंटेन्स वर्क – आऊट आणि पिलाटेस सेशन करते. त्या व्यतिरिक्त किक बॉक्सिंग सुद्धा शिकत आहे. इलाक्षी च म्हणणं आहे कि “मी बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे. यासाठी किक बॉक्सिंग देखील शिकत आहे”.
तानाजी चित्रपटातून पदार्पणकरण्याआधी इलाक्षीने “कोल्ड लस्सी” आणि “चिकन मसाला” ह्या वेब सिरीज मध्ये काम केले आहे आणि लवकरच एका नवीन मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.