मुंबई – देशासमोर उभ्या असलेल्या कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार पुढे सरसावले आहेत. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, वरून धवन, सनी देओल यांच्या पाठोपाठ आता बॉलिवूड निर्माती एकता कपूरने सुद्धा कोरोनाशी लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.निर्माती एकता कपूर हिने तिचा वर्षभराचा पगार ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार,’लॉकडाउनमुळे अनिश्चित काळासाठी सर्व शूटिंग बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या कर्मचाऱ्यांसाठी एकताने आर्थिक मदत केली आहे. एकता कपूरचा वर्षभराचा पगार २.५ कोटी रुपये इतका आहे. या संपूर्ण पगाराचं वाटप ती कर्मचाऱ्यांमध्ये करणार आहे.