सातारा -कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 8, खावली करोना केअर सेंटरमधील 1, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 2, फलटणच्या करोना केअर सेंटरमधील 4, पार्ले (ता. कराड) येथील करोना केंअर सेंटरमधील 1, कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमधील 2 अशा एकूण 18 जणांना रुग्णालयातून दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणाऱ्यांमध्ये पाटण तालुक्यातील नंदगाव येथील 67 वर्षीय पुरुष, कुंभारगाव येथील 27 वर्षीय पुरुष, गलमेवाडी येथील 24 वर्षीय महिला, गावडेवाडी येथील 27 वर्षीय पुरुष, धामणी येथील 31 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील दहिवडी येथील 50 व 58 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील दह्याट येथील 53 वर्षीय पुरुष, खावली केअर सेंटरमधील सातारा तालुक्यातील चाळकेवाडी येथील 30 वर्षीय महिला, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल असणारे 70 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय मुलगा. फलटण करोना केअर सेंटरमधील 34 व 60 वर्षीय महिला, 9 वर्षांची दोन मुले, पार्ले करोना केंअर सेंटरमधील 1 महिला, सह्याद्री हॉस्पिटलमधील 21 वर्षीय पुरुष व 44 वर्षीय महिला यांचा समावेश या करोनामुक्त 18 जणांमध्ये आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारुण रुग्णालयातील 13, पानमळेवाडी येथील 1, शिरवळ येथील 17, कराड येथील 4, वाई येथील 7, रायगाव येथील 7, मायणी येथील 16, पाचगणीच्या बेल एअर पाचगणी येथील 5, दहिवडी येथील 7, फलटण येथील 19 व कोरेगाव येथील 5 अशा एकूण 101 जणांच्या घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 55 वर्षीय पुरुषाचा बेल एअर हॉस्पिटलमध्ये मत्यू झाला आहे. या 55 वर्षीय पुरुषाचा नमुनाही तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये आज तपासणी करण्यात आलेल्या 25 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.
“त्या’ बाळंतिणीनेही करोनाला हरवले
कृष्णा हॉस्पिटलच्या करोना विशेष कक्षात दाखल झालेल्या गलमेवाडी (ता. पाटण) येथील 24 वर्षांच्या करोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेची 24 मे रोजी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली होती. ती महिला बाधित असली तरी नवजात अर्भकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. कृष्णा हॉस्पिटलमधील उपचारानंतर करोनावर मात केलेल्या या महिलेला नवजात बालकासह बुधवारी घरी सोडण्यात आले.