वॉशिंग्टन – अमेरिकेत कमी शिक्षण झालेल्या अशिक्षित लोकांच्या तुलनेत जास्त शिक्षण झालेल्या सुशिक्षित लोकांचे आयुर्मान १० वर्षांनी जास्त असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. म्हणजेच एखाद पदवीधर युवक शालेय पातळीवर शिक्षण सोडून दिलेल्या युवकांपेक्षा जास्त काळ जगतो.
आतापर्यंत अशी मान्यता होती कि श्रीमंतांपेक्षा गरीब लोकांचे आयुर्मान कमी असते, पण आता या नवीन संशोधनामुळे हि गोष्ट समोर आली आहे कि आयुमानाचा संबंध थेट शिक्षणाशी असतो.
अमेरिकाच्या नेशनल एकेडमी ऑफ सायन्सच्या एका नियतकालिकात प्रिंस्टन विश्वविद्यालयात कार्यरत असणारे प्राे. एनी केस आणि प्राे. एंगस डीटन यांनी याबाबतचे संशोधन प्रकाशित केले आहे. त्यांनी या अभ्यासासाठी 1990 ते 2018 या काळातील सुमारे ५ कोटी लोकांच्या मृत्यू प्रमाणपत्राचे संशोधन केले तेव्हा त्याच्या लक्षात हि बाब आली व्यक्तीचे लिंग,वंश किंवा जात याचा आयुर्मानाशी कोणताही संबंध नसतो तर शिक्षणाचा संबंध असतो असे या दोघांचे म्हणणे आहे.