रांची – निलंबित आयएएस पूजा सिंघल विरुद्ध मनी लॉंड्रिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीच्या पथकाने आज झारखंडची राजधानी रांचीमध्ये सहा ठिकाणी छापे टाकले. दरम्यान, या प्रकरणात ईडीने बिहारमधील मुझफ्फरपूरमध्येही छापेमारी केली आहे.
मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी कलमांतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे. सिंघल यांना या महिन्याच्या सुरुवातीला झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात ईडीने मनरेगा निधीच्या कथित गैरव्यवहार आणि इतर आर्थिक अनियमिततेशी संबंधित मनी लॉंड्रिंग चौकशीत अटक केली होती.
याआधी सोमवारी ईडीच्या टीमने साहेबगंजचे जिल्हा खनिकर्म अधिकारी विभूती कुमार यांची रांची येथील त्यांच्या सर्कल ऑफिसमध्ये चौकशी केली होती. ईडीच्या पथकाने विभूती कुमार यांना अनेकवेळा समन्स पाठवले होते, परंतु ते ईडीचे समन्स नाकारत होते आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी कोणतेही समन्स आले नसल्याचे वक्तव्य ते प्रसारमाध्यमांमध्ये करत होते.
दरम्यान, पूजा सिंघल वयाच्या 21 व्या वर्षी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि सहकारी IAS अधिकाऱ्याशी लग्न केले होते. पूजा सिंघलची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. ईडीने 6 मे 2022 मध्ये आयएएस पूजा सिंघलच्या विविध निवासस्थानांवर छापे टाकले आणि तिच्या चार्टर्ड अकाउंटंटच्या निवासस्थानातून 19 कोटी रुपये जप्त केले.