MLA Amba Prasad ED Raid| भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीकडून चौकशी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. यानंतर आता काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद यांचीही ईडीद्वारे मनी लाँडरिंग प्रकरणी बुधवारी रात्री चौकशी करण्यात आली. अंबा प्रसाद यांच्या घरावर त्यांच्या समर्थकांसह सात ठिकाणी छापे टाकले आहेत. यानंतर अंबा प्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाचे तिकीट नाकारल्यामुळेच आपली चौकशी होत आहे, असा आरोप अंबा प्रसाद यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला. त्या म्हणाल्या, ईडीचे अधिकारी पहाटे माझ्या घरात शिरले. अनेक तास त्यांनी मला एकेठिकाणी उभं ठेवलं. मला भाजपानं हजारीबाग मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट दिले होतते, पण मी ते नाकारलं. त्यानंतर माझ्यावर दबावही टाकण्यात आला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडूनही अनेक लोक येत होते, छत्रा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असेही ते सांगत होते. पण मी त्यावर काही उत्तर दिले नाही.”
आमदार अंबा प्रसाद पुढे म्हणाल्या, “हजारीबाग मतदारसंघ आमचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कदाचित आमच्यावर दबाव टाकला जात असेल. आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे आमच्यावर कारवाई केली जात असावी. हजारीबाग लोकसभेतून माझा विजय होईल, अशा बातम्या माध्यमांनी चालविल्या आहेत. त्यामुळेच भाजपाने मला उमेदवारी देऊ केली. ती नाकारल्यानंतरचे परिणाम मी भोगत आहे. मी अदाणींच्या विरोधात कोणताही मुद्दा उचलू नये, अशी समज मला भाजपामधील नेते देत होते. पण मी विषय मांडत राहिल्याने मला या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. “MLA Amba Prasad ED Raid|
१७ ठिकाणांवर छापेमारी
ईडीकडून काँग्रेस आमदार अंबा प्रसाद यांच्या १७ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. हजारीबाग जिल्ह्यातील बरकागाव विधानसभेतील अंबा प्रसाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी निगडित ठिकाणांवर या धाडी पडल्या आहेत. ज्यात त्यांच्या रांची येथील अधिकृत निवासस्थानाचा समावेश आहे.
कोण आहेत अंबा प्रसाद ? MLA Amba Prasad ED Raid|
अंबा प्रसाद या झारखंड विधानसभेतील सर्वात तरूण आमदार आहेत. झारखंडचे माजी मंत्री योगेंद्र साव यांच्या त्या कन्या असून अंबा प्रसाद यांच्या मातोश्री निर्मला देवी यादेखील माजी आमदार आहेत.
हेही वाचा: