योग्य ते पदार्थ खाऊन वाताच्या आजारावर होऊ शकते मात

वातामुळे होणारा त्रास मोठ्ठा आहे; पण, योग्य ते पदार्थ खाऊन व नको ते पदार्थ खाण्याचे टाळून या त्रासावर नियंत्रण आणता येते. त्याविषयी...

रोजच्या व्यवहारात संधीवात, अर्धांगवात, आमवात, अंगात वात शिरणे किंवा पोटात वात धरणे यासारख्या चार-पाच विकारच वातामुळे होतात, असा खूप जणांचा गैरसमज असतो. वास्तविक पायाला मुंग्या येणे, कंबर दुखणे, मान दुखणे, पोटात वायगोळा येणे, यासारखे विकार आणि त्यांच्याच जोडीला ऐकू कमी येणे किंवा कर्णबांधीर्य, चक्‍कर येणे, रक्‍तदाब वाढणे हे विकार देखील वातामुळेच होत असतात. ( arthritis treatment in marathi )

चुकीचा आहार बरेच दिवस चालू राहिल्यानंतर हे वातविकार उत्पन्न होत असल्याने पित्त किंवा कफ विकारांप्रमाणे आहारातील चुका आणि होणारा त्रास यांचा संबंध बऱ्याचवेळा लवकर लक्षात येत नाही. म्हणून वातविकारांचा पथ्यकर आहारांचे मार्गदर्शन जास्त गरजेचे आहे.

वात विकार असल्यास काय खावे
-वात विकारांसाठी प्राधान्याने गव्हाची पोळी, भेंडी, कोवळी वांगी, तूर, किंवा मुगाच्या डाळीची आमटी, वरण असा आहार ठेवावा.
-उडदाच्या डाळीचे घुटे किंवा आमटी आले, लसणाची चटणी, कांदा, गाजर, मुळा यांची कोशींबीर नेहमी खाण्यात ठेवावी.
-मासांहारी लोकांना ताजे मटण किंवा मटणाचे सुप घ्यावयास हरकत नाही.
-रोज सकाळ-संध्याकाळ एक कप गरम दूध प्यावे.
-जेवणात तुपाचे प्रमाण पुरेसे असावे.
-तिळाची किंवा शेंगदाण्याची किंवा सुक्‍या खोबऱ्याची चटणी कमी तिखट असल्यास खावयास हरकत नाही.
-मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू विशेषतः स्त्रियांनी वातविकारांमध्ये आवर्जुन खावे. प्रसुतीनंतरच्या काळात ज्याप्रमाणात यांचा वात कमी करण्यासाठी उपयोग होतो, तसेच इतरवेळी देखील वात कमी करण्यासाठी उपयोग होतो.
-थंड हवामानात गरम पाणी प्यावे.
-डाळिंब, ताडगोळे, द्राक्षे, संत्री हे फळे उपयुक्‍त आहेत.
-जेवणात लिंबू, चिंचचा नियमित वापर करावा.
-नाष्ट्यासाठी शिरा, उपमा चालू शकतो.

वात विकारामध्ये टाळण्याचा आहार ( arthritis treatment in marathi )
झालेला वात विकार लवकर बरा व्हावा, आणि हा विकार नसलेल्या माणसाला तो होऊ नये या दोन्ही दृष्टिकोनातून पुढील आहार सदैव टाळावा

-वरीचे तांदूळ
-नाचणीची भाकरी
-मेथी, चुका, चाकवत, आळू यासारख्या पालेभाज्या वारंवार खाणे टाळावे.
-कारली
-चवळी, मूग, मटकी, वाल, चणे, वाटाणा, हरभरा, पावटा या कडधान्यांच्या उसळी
-रताळी, साबुदाणा,
-बटाटा
-मध जास्त खाऊ नये.
-सुकट बोंबील, सुके मासे, शिळे मांस, अंडी, तंदुरी चिकन
-अतिथंड पदार्थ, कोल्ड्रिंक्‍स
-दही व दह्याचे पदार्थ.
-वेफर्स, चिवडा, भेळ, फरसाण, पापड, ब्रेड, भजी, खाकरा
हे सर्व पदार्थ वातप्रकोपक असतात. म्हणून ते टाळणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.