फिलीपाईन्सला भूकंपाचे धक्के

मनिला – फिलीपाईन्सला आज भूकंपाचे तीव्र धक्के बसले. राजधानी मनिलाजवळ काही इमारती कोसळल्यामुळे पाच जण ठार झाले. हे धक्के जाणवल्याने शेकडो नागरिकांनी घरांमधून बाहेर पडून रस्त्यांवर धाव घेतली. इमारतींना भूकंपाचे धक्के जाणवायला लागल्यावर सरकारी कार्यालये आणि व्यापारी केंद्रांमधून “इमर्जन्सी अलार्म’वाजायला लागल्यावर अनेक नागरिकांनी भीतीपोटी पळ काढला. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण गाडगे गेले असल्याची शक्‍यता लक्षात घेऊन मदत आणि बचाव कार्याने वेग घेतला आहे.

पोराक भागातल्या शॉपिंग मॉलच्या ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर लुबाओ येथील एका इमारतीखाली एक महिला आणि तिचा नातू गाडला गेला आहे, असे पॅंपांगा प्रांताच्या गव्हर्नर लिला पिनेदा यांनी सांगितले.

या भूकंपामुळे वीजप्रवाह खंडीत झाला आहे. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे येऊ लागले आहेत. पडलेल्या इमारतींखाली आणखी काही जण अडकले असल्याची शक्‍यता आहे. संध्याकाळी सव्वा 5 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी होती, असे युएस जिऑलोजिकल सर्व्हेने म्हटले आहे. 17 व्या शतकातील एक पुरातन चर्च, विमानतळ आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे नागरी संरक्षण विभागाचे प्रवक्‍ते इद्‌गार पोसादास यांनी सांगितले. उत्तर फिलीपाईन्सला देखील भूकंपाचा तीव्र धक्का बसला असून तेथेही काही उंच इमारती कोसळल्याचे वृत्त आहे.

क्‍लार्क विमानतळ बंद करण्यात आल्याने हजारो प्रवासी विमानतळाच्याच परिसरामध्ये अडकून पडले आहेत. विमानतळाच्या नुकसानीचे फोटो अनेक प्रवाशांनी सोशल मिडीयावर अपलोड केल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.