त्यामुळे ब्राव्होला स्ट्राईक नाकारली – महेंद्रसिंग धोनी

बंगळुरू – चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान झालेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने रंगत आणली होती. मात्र, त्याने 19 व्या षतकांत तीन वेळा एकेरी धाव नकारल्याने सामना चेन्नईने गमावला असे म्हणनाऱ्यांन धोनीने त्याचे कारण सांगताना म्हणाला आहे की, अखेरच्या षटकांमध्ये चेंडू फलंदाजांना खेळण्यास्‌ अवघड जात होता. त्यातच मी खेळपट्टीवर टिकाव धरुन होतो त्यामुळे नवोदित ब्राव्हो पेक्षा मला चेंडू खेळून काढने सोपे जात होते. त्यामुळे मी ब्राव्होला स्ट्राईक नाकारत होतो.

यावेळी पुढे बोलताना धोनी म्हणाला की, ‘डेथ ओव्हरमध्ये फलंदाजी करणे अवघड होते. चेंडू बॅटवर येत नव्हता. त्यामुळे नवीन फलंदाज स्ट्राइकवर आला असता, तर त्याला संघर्ष करावा लागला असता. या सामन्यात मी चांगला स्थिरावलो होतो आणि त्यामुळे हा धोका मी पत्करू शकत होतो. संघालाही अनेक धावांची गरज होती. 10-12 चेंडूंत आम्हाला जवळपास 36 धावा हव्या होत्या. त्यामुळे चौकारांची आतषबाजी करावी लागणार होती. त्यामुळे पराभवानंतर तुम्ही एक-दोन धावांचा हिशोब करत आहात. पण, त्याचवेळी मी स्ट्राईक दिली असती आणि काही चेंडू निर्धाव राहिले असते तर. त्याच निर्धाव चेंडूत मला चौकार लगावता आले असते, असा विचार केला गेला असता’.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.