“ई-बस’चा “चार्जिंग पॉईंट’ एक कोटीचा

पिंपरी  – पीएमपीएमएलसाठी खरेदी करण्यात आलेल्या इलेक्‍ट्रिक बसगाड्यांसाठी निगडीतील भक्‍ती-शक्‍ती आगारात “चार्जिंग पॉईंट’ सुरू येणार आहेत. त्यासाठी विद्युत विषयक कामे करण्याकरिता 1 कोटी 10 लाख रूपये खर्च होणार आहेत.

पीएमपीएमएलसाठी 500 इलेक्‍ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहेत. या 500 बसपैकी पहिल्या टप्प्यात 150 ई-बस घेण्याचे ठरविण्यात आले. या 150 बससाठी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेकडून (सीआयआरटी) निविदा संच, टेक्‍निकल स्पेसिफिकेशन तयार करून घेण्यात आले आहे. या बस दोन मॉडेलमध्ये असणार आहेत. त्यामध्ये 25 ई-बस या 9 मीटर, नॉन बीआरटी, एसी आहेत.

तर, 125 ई-बस या 12 मीटर, 900 एमएम फ्लोअर हाईट, बीआरटी एसी आहेत. 150 इलेक्‍ट्रिक ई – बसपैकी 25 ई-बस 40 रूपये 32 पैसे प्रति किलोमीटर दराने घेण्यात येणार आहेत.
संबंधित ठेकेदाराला प्रति बस 50 लाख रूपये इतकी सबसिडी म्हणजेच 25 बसकरिता 12 कोटी 50 लाख रूपये देण्यात येणार आहेत. पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या 60 आणि 40 टक्के या प्रमाणानुसार 15 ई-बस पुणे शहरात आणि 10 ई-बस पिंपरी – चिंचवड शहरात संचलनासाठी नेमण्यात आल्या आहेत.

या बसगाड्यांसाठी निगडीतील भक्‍ती-शक्‍ती आगारात “चार्जिंग पॉईंट’ टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. सन 2019-20 मधील या कामाअंतर्गत राज्य विद्युत वितरण कंपनीच्या महिंद्रा फीडरवरून वीज पुरवठा घेण्यात येणार आहे. त्यासाठी काही आवश्‍यक कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. निविदा दर 1 कोटी 34 लाख रूपये ठरविण्यात आला. त्यानुसार, तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी एम.बी. इलेक्‍ट्रिक ऍण्ड कंपनीने निविदा दरापेक्षा 18.99 टक्के कमी म्हणजेच 1 कोटी 9 लाख रूपये दर सादर केला. या दरास महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍तांनी 31 जुलै 2019 रोजी मान्यता दिली. त्यानुसार, एम. बी. इलेक्‍ट्रिक कंपनीसमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here