पुणे – मनात जर लोकसेवेची भावना असेल, तर कोणीही काही करू शकते. याचा अनुभव ऍड. वाजेद खान (बिडकर) यांच्यापासून येत आहे. फौजदारी केसेस लढणारे ऍड. खान सोशल मीडीयाचे माधयम वापरुन फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्स अप, टिक टॉकचे आणि फोनच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत कायदेविषक मार्गदर्शन करत आहेत.
लॉकडाऊनमध्ये कसे राहायचे, ईएमआय कशी लांबबायची, लॉकडाऊनच्या काळात पोटगी कशी मिळवायची, पगारावरून मालक-कामगार वाद झाल्यावर काय करायचे, घरभाड्याअवरून मालक वाद घालत असल्यावर काय करायचे, आदी बाबींवर ऍड्. खान मोबाईलवरून मोफत मार्गदर्शन करत आहेत. सध्या पोलीस कर्मचारी, डॉक्टर, शासकीय कर्मचारी, पत्रकार, करोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खान यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.